युगेंद्र पवार यांची लढाई स्वतःचे डिपॉझिट वाचवण्यासाठी असेल, तर अजितदादा यांची लढाई विक्रम मोडण्यासाठी
Maharashtra Assembly Elections 2024: Ajit Pawar vs Yugendra Pawar.
बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांची लढाई स्वतःचे डिपॉझिट वाचवण्यासाठी असेल, तर अजितदादा यांची लढाई 2019 च्या मताधिक्याचा विक्रम मोडण्यासाठी असेल. असे म्हणत, राषट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शरद पवारगटाला डिवचले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिण्यात आली आहे. यासंदर्भात, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सुराज चव्हाण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक व्हिडिओ शेअर करत भाष्य केले आहे. या व्हिडियोमध्ये चव्हाण यांनी म्हटले आहे की, “बारामती विधानसभा मतदार संघात युगेंद्र पवार यांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी असेल आणि अजितदादा पवार यांची लढाई 2019च्या मताधिक्याचा रेकॉर्ड तोडण्यासाठी असेल. तुतारी गटाकडून जी यादी जाहीर करण्यात आली, त्यात 10 पेक्षा जास्त भाजपमधून आलेल्या निष्ठावान, स्वाभिमानी शिलेदारांना न्याय दिल्याबद्दल मी प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांचे हार्दिक अभिनंदन!”
शरद पवार यांनी अजित पवार यांच्याविरोधार थेट युगेंद्र पवार यांनाच मैदानात उतरवले आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती विधानसभा मतदार संघात असणार आहे.
Web Title: Yugendra Pawar’s battle will be to save his own deposit, Ajitdada’s battle will be to break the record
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study