Home पालघर धक्कादायक! अल्पवयीन तरुणीवर प्रियकरानं केला गोळीबार

धक्कादायक! अल्पवयीन तरुणीवर प्रियकरानं केला गोळीबार

Breaking News | Palghar Firing crime:  एका रिसॉर्टवर अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार झाल्याची घटना घडली.

Boyfriend shoots firing minor girl

 पालघर: पालघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पालघरच्या केळवे येथील एका रिसॉर्टवर अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेत अल्पवयीन मुलगी तेजल शिवराम भिडे ही जखमी झाली आहे. पालघरच्या माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारानंतर जखमी मुलीवर बोईसर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेली माहिती अशी की, , बंदूक दाखवताना प्रियकराकडून चुकून गोळी लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.  दरम्यान, या घटनेनंतर प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मागील आठवड्यात देखील केळवे येथे एका तरुणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. अशातच ही घटना ताजी असतानाच आज अल्पवयीन तरुणीवर प्रियकराकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे.

दरम्यान, पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. नेमका कसा हा प्रकार घडला? याची माहिती पोलिस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, बंदूक दाखवताना प्रियकराकडून चुकून गोळी लागल्याची माहिती देण्यात आली आहे. पण हेच नेमकं कारण आहे की आणखी काही वेगळा प्रकार आहे, यासंदर्भातील अधिकचा तपास पोलिस करत आहेत.

Breaking News: Boyfriend shoots firing minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here