Home अहमदनगर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा युवकाला अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा युवकाला अटक

Breaking News | Ahilyanagar Crime: एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन, तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.

youth was arrested for abusing a minor girl

अहिल्यानगर: नगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन, तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.

अक्षय रायल चव्हाण (वय २४, रा. घोटवी, ता. श्रीगोंदा, असे त्याचे नाव असून त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी अक्षयने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले व तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.

याप्रकरणी पिडितेच्या फिर्यादीवरून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना समांतर तपास करून संशयित आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बबन मखरे, हृदय घोडके, पंकज व्यवहारे, फुरकान शेख, अमोल कोतकर, मेघराज कोल्हे व अरुण मोरे यांचे पथक नेमण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या मदतीने संशयित आरोपीचा शोध घेतला.

२४ जानेवारी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घोटवी येथील संशयित आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

Web Title: youth was arrested for abusing a minor girl

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here