Home संगमनेर संगमनेर: नायलॉन मांजाचा गळ्याला फास लागल्यामुळे तरुण जखमी

संगमनेर: नायलॉन मांजाचा गळ्याला फास लागल्यामुळे तरुण जखमी

Breaking News | Sangamner: तरुण सकाळी गावातून घरी जात असताना नायलॉन मांजाचा गळ्याला फास लागल्यामुळे जखमी.

Youth injured due to nylon rope hanging around his neck

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील तरुण सकाळी गावातून घरी जात असताना नायलॉन मांजाचा गळ्याला फास लागल्यामुळे जखमी झाले. यामुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संजय बबन कहार (वय 35) हे नित्याचे काम उरकून घरी जात असताना येथील आश्वी खुर्द येथील राजवाडा परिसरामध्ये काही मुले पतंग खेळत होते. अचानक पंतग जमिनीवर येत असताना नायलॉन मांजाचा गळ्याला फास लागून ते जखमी झाले.

गावामध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. दरम्यान, नशीब बलवत्तर होते म्हणून मोठी दुर्घटना होण्यापासून कहार वाचले. महसूल व पोलीस प्रशासनाने पररिसरामध्ये जर कोणी नायलॉन मांजा विक्री करत असेल तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रवरा कारखान्याचे माजी संचालक अ‍ॅड. अनिल भोसले यांनी केली.

Web Title: Youth injured due to nylon rope hanging around his neck

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here