अहिल्यानगर: तरुणाचा धरणात बुडून मृत्यू
Breaking News | Ahilyanagar: मांडओहोळ धरणामध्ये पोहण्यासाठी गेला आणि बेपत्ता झाला. मृतदेह बाहेर काढण्यात आला.
पारनेर : तालुक्यातील कर्जुले हर्या येथील ३० वर्षीय विवाहित तरुण दोन मित्रांसमवेत गुरुवारी दुपारी ३ वाजता मांडओहोळ धरणामध्ये पोहण्यासाठी गेला आणि बेपत्ता झाला होता.
शुक्रवारी दुपारी १.३० वाजता अहिल्यानगर येथून आलेल्या एनडीआरएफच्या पथकाकडून शोधमोहीम राबवली. त्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. संदीप प्रकाश कोकाटे (वय ३०) असे मयततरुणाचे नाव आहे.
धरणात पोहण्यासाठी गेलेला संदीप कोकाटे हा तरुण गुरुवारी बेपत्ता झाला. या घटनेची माहिती ग्रामसेवक विकास जाधव यांनी व ग्रामस्थांनी तहसीलदार गायत्री सौंदाणे यांना दिली. त्यांनी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले. शुक्रवारी दुपारी मांडओहोळ धरणावर पथकाने शोध मोहीम राबवली. यावेळी गाळात व कपारीला रुतलेला मृतदेह त्यांना आढळून आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मयत संदीप हा विवाहित असून त्याच्या पाठीमागे पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे.
Breaking News: Youth drowns in dam, dies