Breaking News | Akole: धामणगावपाट येथील रहिवासी तरुणाला रात्री झोपेत सर्पदंश झाल्याने त्याचा दुदैवी मृत्यू.
अकोले: तालुक्यातील धामणगावपाट येथील रहिवासी तरुणाला रात्री झोपेत सर्पदंश झाल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली.
सौरभ बादशहा चौधरी रा. धामणगावपाट ता. अकोले असे या मयत तरुणाचे नाव आहे. सौरभ हा रात्री १०.३० च्या सुमारास मोबाईल पहात असताना झोपी गेला. रात्री झोपेतच त्याला सर्पदंश झाला. सकाळी त्याच्या पत्नीने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठला नाही. वडील बादशहा चौधरी यांनी त्याला तात्काळ कोतुळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला अकोले रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. तेथील अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले.
सौरभ यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, छोटा मुलगा, एक बहिण असा परिवार आहे.
Breaking News: Youth dies of snakebite