अहमदनगर: शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू
Breaking News | Ahmednagar: घराजवळील असलेल्या शेततळ्याजवळ फिरत असताना पाय घसरून शेततळ्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना.
राहाता : घराजवळील असलेल्या शेततळ्याजवळ फिरत असताना पाय घसरून शेततळ्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रवींद्र जेजुरकर (वय ३०) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अस्तगाव रोडलागतच्या शेततळ्यात बुडालेल्या जेजुरकर याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी शिर्डी तसेच राहाता नगरपालिका अग्निशमन दल, राहाता पोलिस स्टेशनच्या पथकाने मदत केली. शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास राहात्याचे पोलिस निरीक्षक सोपानराव काकड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Web Title: Youth dies after drowning in farm
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study