तरुणीच्या मोबाईलवर अश्लील फोटो मेसेज करीत ब्लॅकमेलिंग करून केले धक्कादायक कृत्य
Jalgaon ransom Case: तरुणीला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला.
जळगाव: शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या २२ वर्षीय तरुणीला एका व्यक्तीने व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरात रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २२ वर्षीय तरुणी कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करते. ८ ते १६ जुलै असे आठ दिवस पीडितेच्या व्हॉटस्ॲप क्रमांकावर तिचे फोटो एडिट करून सोबत इतरांचे अश्लील फोटो पाठवत विनयभंग केला. तिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली. तरुणीने तातडीने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.
Web Title: young woman was sent an obscene message on WhatsApp and asked for ransom