तरुणीवर कॅफेत बलात्कार; संतापजनक घटनेनं खळबळ
Satara Rape Case: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर कॅफेत पाच वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सातारा : लग्नाचं आमिष देऊन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालक्यातल्या कडेगावात हा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीनं तरुणीवर वर्षभरात तब्बल पाचवेळा बलात्कार केल्याचा खुलासाही तपासातून झाला आहे. त्यामुळं आता आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीला आरोपीनं फूस लावून प्रेमात पाडलं. त्यानंतर आरोपी तरुणीच्या इच्छेविरोधात एका कॅफेत घेऊन गेला. तिथं तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला. गेल्या वर्षभरापासून आरोपी तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर सातत्यानं बलात्कार करत होता. त्यानंतर तरुणीनं घडलेला सारा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल करत आरोपीला अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करून आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्कार, पोक्सो आणि अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा
आता साताऱ्यातील वाईमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरातील कॅफे बंद करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळं आता वाईतील या बलात्कार प्रकरणाचा अधिक तपास विभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे या करत आहेत.
Web Title: a young woman was rape in a cafe
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App