अहिल्यानगर: तरुणीची गळफास घेत आत्महत्या
Breaking News | Ahilyanagar Suicide: राहत्या घरात छताला गळफास घेऊन २० वर्षीय तरुणीने आत्महत्या.
अहिल्यानगर | जेऊर : राहत्या घरात छताला गळफास घेऊन २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. ही घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील गवारे नाना रोडवर २३ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता सुमारास घडली. पुनम राजू ढाबे (रा. पिंपळगाव माळवी, ता.नगर) असे मृत तरुणीचे नाव आहे.
पूनम हिने घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास येताच तिला खासगी अॅम्ब्युलन्सने दत्तात्रय गुलाब जाधव याने सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासून ती औषध उपचारापूर्वीच मयत झाली असल्याचे घोषित केले. याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. खेडकर यांच्या अहवालावरून एमआयडीसी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Breaking News: Young woman commits suicide by hanging herself