Home अहमदनगर होमगार्ड असणाऱ्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

होमगार्ड असणाऱ्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

Shrirampur rape Case:  अल्पवयीन मुलीला अमिष दाखवून लॉजवर मुलीवर अत्याचार.

young man who is a home guard rape a minor girl

श्रीरामपूर: होमगार्डचे काम करत असणार्‍या एका तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला अमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात होमगार्डविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरात दत्तनगर परिसरात राहणारा अनिल छगन बनकर (वय 42) याने एका 16 वर्षाच्या विद्यार्थीनीचा ती शाळेत जातांना पाठलाग करून तिच्याशी सलगी केली. तिला अमिष दाखवून लॉजवर व त्याच्या घरात या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. अनिल बनकर हा होमगार्डमध्ये बर्‍याच वर्षापासून कार्यरत होता. आरोपी विवाहित असून त्याला तीन मुले आहेत.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अनिल छगन बनकर याचेविरुध्द भादंवि कलम 354, 354 (ड), 376 (2) (एन) बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलम 3, 4, 5. (एल) 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अनिल छगन बनकर यास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवरे हे करत आहे.

Web Title: young man who is a home guard rape a minor girl

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here