अहमदनगर: तरुणाला झाडाला बांधून मारहाण, तरुणावर उपचार सुरु
Breaking News | Ahmednagar: घरात चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयातून एका परप्रांतीय तरुणाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर.
अहमदनगर : घरात चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयातून एका परप्रांतीय तरुणाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी (दि.२५) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सारसनगर परिसरातील औसरकर मळा येथे घडली. याप्रकरणी पाच जणांविरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण भगवान औसरकर, बाबासाहेब भगवान पुंड, विशाल किसन इवळे, ऋषिकेश आजिनाथ जायभाय, रुतिक बाबासाहेब पुंड (सर्व रा. औसरकर मळा, सारसनगर, नगर), अशी गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत. याबाबत पोलिस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग बारगजे यांनी फिर्याद दिली आहे.
मंगळवारी सायंकाळी राजू हिरा घोष (वय ३२, रा. पश्चिम बंगाल) हा चोरी करण्याच्या उद्देशाने आला असल्याचा संशय आरोपींना आला. त्यांनी त्याला पकडून जवळच असलेल्या झाडाला दोरीने बांधले. त्यानंतर लाकडी दांडक्याने त्याच्या पायावर, पोटावर व चेहऱ्यावर मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: young man was tied to a tree and beaten, the young man was treated
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study