भयानक! रस्त्यावर तरुणाची गोळ्या घालून हत्या
Breaking News | Crime: रस्त्यावर तरुणाची गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना.
छत्रपती संभाजीनगर : येथील वडगाव-तिसगाव रस्त्यावर तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि.१९) रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कपिल सुदाम पिंगळे (वय २८, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या तिसगाव-वडगाव मार्गावर साईबाबा चौकात गोळी झाडून एकाची हत्या केल्याची घटना कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलांच्या शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. घटनेची माहिती सरपंच सुनील काळे यांनी पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खून झालेल्या तरुणाचे नाव कपिल पिंगळे (रा. रांजणगाव) असे आहे.
शुक्रवारी पहाटे साईनगर सिडको येथील महिला कचरा टाकण्यासाठी तिसगाव वडगाव मार्गावरील साईबाबा चौकात गेल्या असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला तरुण दिसला. घाबरलेल्या महिलांनी घरी येऊन हा प्रकार पतीच्या कानावर टाकला. क्षणात घटनेची माहिती परिसरात पसरली. पुढे माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोनि कृष्णा शिंदे, फौजदार संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार विकास वैष्णव, विशेष शाखेचे योगेश शेळके, विक्रम वाघ, राजेभाऊ कोल्हे, बाळासाहेब आंधळे, डिबी पथकाचे विनोद नितनवरे, फौजदार मनोज शिंदे आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी एक गावठी कट्टा आणि गोळी झाडल्यानंतर रिकामे राहिलेले एक काडतूस पोलिसांना आढळून आले.
Web Title: young man was shot dead on the street
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study