ट्रकने अंत्यविधीवरून येणाऱ्या गावकऱ्यांना चिरडलं ! पाच ठार
Breaking News | Ahmednagar: अंत्यविधीवरुन परतत असणाऱ्या नागरिकांना ट्रकने चिरडले. पाच जण ठार.
अहमदनगर: कल्याण नगर महामार्गावर एक भीषण घटना घडल्याचे समोर आले आहे. अंत्यविधीवरुन परतत असणाऱ्या नागरिकांना ट्रकने चिरडले आहे. यात पाच गावकरी ठार झाले आहेत.
गावातील व्यक्तीचा अंत्यविधी कार्यक्रम उरकून येत असताना ही दुर्घटना घडली. या अपघातानंतर गावकरी आक्रमक झाले असून रास्ता रोकोची भूमिका नागरिकांनी घेतली असल्याची माहिती समजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी : जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी येथे ग्रामस्थ एका व्यक्तीच्या अंत्यविधिवरून परतत होते. त्यावेळी त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने चिरडलं. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी तातडीने दवाखान्यात हलवले होते. अपघातानंतर नागरिकांनी कल्याण नगर महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरु केले होते अशी माहिती समजली आहे.
Web Title: truck crushed the villagers coming from the funeral five killed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study