Home संगमनेर संगमनेरात तरुणास मारहाण करून कोयत्याचा धाक दाखवून लुटले

संगमनेरात तरुणास मारहाण करून कोयत्याचा धाक दाखवून लुटले

Breaking News | Sangamner Crime: एका कापड दुकानात काम करून घरी जाणाऱ्या तरुणाला पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कोयत्याचा धाक दाखवून पाच हजार रुपये काढून घेतले, तसेच कोयत्याने डोक्यावर आणि दगडाने पाठीवर मारून दुखापत केली.

young man was beaten up and robbed in Sangamner

संगमनेरः शहरातील एका कापड दुकानात काम करून घरी जाणाऱ्या तरुणाला पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कोयत्याचा धाक दाखवून पाच हजार रुपये काढून घेतले, तसेच कोयत्याने डोक्यावर आणि दगडाने पाठीवर मारून दुखापत केली. त्यानंतर म्हाळुंगी नदीवरील पुलावरून ढकलून देत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी तिघांसह अनोळखी दोन जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील कापड दुकानात काम करणारा शुभम सुरेश भोईर (वय २८) हा रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास काम आवरून घोडेकर मळा येथील घरी चव्हाणपुरा मार्गे दुचाकीवरून चालला होता. त्यावेळी म्हाळुंगी नदीवरील पुलावर साई सूर्यवंशी, अतुल सूर्यवंशी (दोघेही रा. अकोले नाका) व अनिकेत मंडलिक (रा. माळीवाडा) यांच्यासह अनोळखी दोन ते तीन जण थांबलेले होते. त्यांनी पुलावर वाहन थांबवून चावी काढून घेत पैसे मागितले. तेव्हा त्यांना पैसे नसल्याचे सांगितल्याचा राग आल्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

साई सूर्यवंशी याने कपड्याच्या आत लपवलेला लोखंडी कोयता काढून धाक दाखवत खिशातील पाच हजार रुपये काढून घेतले, तसेच कोयत्याने डोक्यावर मारत दुखापत केली. याचबरोबर अनिकेत मंडलिक याने जवळ पडलेला दगड उचलून पाठीत मारला. सोबत असलेल्या इतर दोन ते तीन जणांनी देखील शिवीगाळ करून मारहाण केली.

दरम्यान, आरडाओरड ऐकून जवळील एका महिला आली. त्यावेळी आमच्या विरुद्ध तक्रार दिली, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन पळून गेले. त्यानंतर सदर महिलेने जखमी अवस्थेत शुभमला घरी नेले. याप्रकरणी शुभम भोईर याने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी तिघांसह अनोळखी दोन ते तीन जणांवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करत आहे.

Breaking News: young man was beaten up and robbed in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here