अहमदनगर: गोदावरीत तरुण बुडाला; महिलेने साडी फेकून दोघांना वाचविले, एक बेपत्ता
Breaking News | Ahmednagar: पाण्याच्या प्रवाहात नदीच्या किनारी असलेल्या पाइप काढण्यासाठी गेलेले कारवाडी- हंडेवाडी येथील शेतकरी पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याने बेपत्ता.
कोपरगाव : दारणा धरणातून गोदावरी नदीला विसर्ग सोडण्यात आल्याने पाण्याच्या प्रवाहात नदीच्या किनारी असलेल्या पाइप काढण्यासाठी गेलेले कारवाडी- हंडेवाडी येथील शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे (वय २५) पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याने बेपत्ता झाले. असून पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोध कार्य सुरू असल्याचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी सांगितले.
कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी मंजूर येथील गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईपचा मंजूर बंधारा असून या पुलाजवळ शेतकरी संतोष भीमाशंकर तांगतोडे (वय २५), अमोल तांगतोडे (वय ३०), प्रदीप तांगतोडे (वय २८) व नारायण तांगतोडे (वय ५२) हे गोदावरी नदीच्या पात्राला पाणी येणार असल्याने मोटारी काढण्यासाठी गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष वाहत चालल्याचे नदी किनारी शेळी चारण्यासाठी आलेल्या ताईबाई छबुराव पवार व छबुराव बाबूराव पवार यांच्या निदर्शनास येताच ताईबाई पवार यांनी आपली स्वतःची साडी सोडून तरुणांच्या दिशेने फेकून त्यातील अमोल व प्रदीप या दोघांना आधार देऊन वाचवले. प्रशासनाच्या सहकार्याने पोहणाऱ्या तरुणांनी शोधकार्य सुरू केले. अमोल व प्रदीप हेही पाण्यामध्ये गुदमरले होते परंतु छाती दाबून उलटे करून पोटातून पाणी काढण्यात आले व त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाहून गेलेल्या संतोष याचा सायंकाळपर्यंत शोध लागू शकला नाही.
Web Title: young man drowned in the Godavari The woman threw her saree
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study