Home औरंगाबाद काम आटोपून आई-वडील घरी आले, इंजिनिअर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला

काम आटोपून आई-वडील घरी आले, इंजिनिअर मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला

उच्चशिक्षित सिविल इंजिनियर असलेल्या ३० वर्षीय तरुणाने ताणतणावरून स्वतःच्या गळ्याला धारदार चाकूने वार करून आत्महत्या (Suicide) आत्महत्या केल्याची घटना.

young man committed suicide by stabbing his own neck with a sharp knife due to stress

औरंगाबाद: उच्चशिक्षित सिविल इंजिनियर असलेल्या ३० वर्षीय तरुणाने ताणतणावरून स्वतःच्या गळ्याला धारदार चाकूने वार करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.  ही घटना रविवार दुपारच्या सुमारास झांबड स्टेट येथे उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. भगिदराकडून व्यवसायात फसवणूक झाल्याने नैराश्येतून ही आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  महेंद्र कुमार संजय गुंगे (वय ३०, रा. श्रेय नगर झांबड स्टेट छत्रपती संभाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. महेंद्र कुमार हा उच्चशिक्षित कुटुंबातील तरुण लहानपणापासून शिक्षणात हुशार होता. जांभळी स्टेट येथील वसाहतीमध्ये आई-वडिलांसह राहत होता. त्याने नागपूर येथील व्ही. एन. आयटी येथून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं होतं.

महेंद्र कुमार हा उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चार वर्षांपासून सिविल इंजिनिअर म्हणून काम करत होता. एका कॉन्ट्रॅक्टर सोबत चार वर्षांपूर्वी महेंद्र कुमार याची ओळख झाली होती. त्यांनी सोबत काम करायला सुरुवात केली. मात्र कामांमध्ये महेंद्र कुमार याची भागिदाराने फसवणूक केली. त्यासोबतच जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या होत्या, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. या प्रकरणी भागिदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

महेंद्रने याबाबत आई-वडिलांना सांगितलं होतं. यानंतर त्याच्या आईने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्ती विरोधात तक्रार दिली. दरम्यान रविवारी दुपारी आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले. यावेळी महेंद्र घरीच होता. त्याने चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली. काम आटोपून आई-वडील घरी आले. त्यावेळी महेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याला तात्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, भागिदारांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीच्या ताणतणावातून महेंद्र कुमारने आत्महत्या केली, असा नातेवाईकांचा आरोप आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सा. फौ. राहुल भालेराव करीत आहेत.

Web Title: young man committed suicide by stabbing his own neck with a sharp knife due to stress

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here