आईने मुलगा दरवाजा उघडत नसल्याचे पाहून शेजारच्याना हाक मारली अन धक्कादायक प्रकार उघडकीस
Ahmednagar News: ३० वर्षीय तरुणाने नैराश्यातून राहत्या घरात गुरुवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
उक्कलगाव: येथील ३० वर्षीय तरुणाने नैराश्यातून राहत्या घरात गुरुवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सहा महिन्यांपूर्वी या तरुणाच्या पत्नीने आत्महत्या केली होती. कुटुंबात एकाकी पडल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याची चर्चा आहे. सतीश बापूसाहेब पवार असे मयताचे नाव आहे.
सतेश याने गुरुवारी घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. आई व मोठा भाऊ हे दोघेही एका शेतकऱ्यांच्या घरी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित. ते दोघेही कुटुंबासह तेथे वास्तव्यास होते. आईने मुलगा दरवाजा उघडत नसल्याचे पाहून शेजारच्या लोकांना हाक मारली. त्यानंतर सामजिक कार्यकर्ते दिलीप थोरात आणि इतर सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. हवालदार रामेश्वर ढोकणे व आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी दरवाजा तोडून तरुणाचा मृतदेह खाली उतरवून घेतला. त्याला साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर नातेवाइकांकडे मृतदेह देण्यात आला. शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मागील काही महिन्यांपूर्वीच सतीश पवार याच्या पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
याप्रकरणी पत्नीच्या आजीने सतीश पवार याच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पवार याच्या पाठीमागे आई, मोठा भाऊ एक मुलगा असा परिवार
आत्महत्या करण्यापूर्वी गुरुवारी रात्री गावातील एका लग्नाच्या वरातीत पवार हा मनसोक्तपणे आनंदाने नाचला होता. वरातीचा त्याने आनंद घेतला. हा क्षण त्यांचा शेवटचा ठरल्याची चर्चा गावात सुरू होती.
Web Title: young man committed suicide by hanging himself at midnight
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App