Home अहमदनगर संगमनेर: फायनान्स कंपनीच्या पैशाच्या मागणीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

संगमनेर: फायनान्स कंपनीच्या पैशाच्या मागणीला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Breaking News | Sangamner Suicide: फायनान्स कंपनीच्या वारंवार केल्या जात असलेल्या पैशाच्या मागणीला कंटाळून शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार.

young man commits suicide after being fed up with the demand of money from the finance company

संगमनेर: फायनान्स कंपनीच्या वारंवार केल्या जात असलेल्या पैशाच्या मागणीला कंटाळून संगमनेर तालुक्यातील कनोली येथीलतरुण  शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

दीपक दादासाहेब बलसाने असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्याच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे. या सुसाईड नोट्सच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी बलसाने याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपण फायनान्स कंपनीला वारंवार पैसे दिले मात्र फायनान्स कंपनीतील कर्मचारी आपल्याकडे वारंवार पैशाची मागणी करत असल्यामुळे या मागणीला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. दरम्यान आत्महत्या करणाऱ्या बलसाने याला घटनेपूर्वी संगमनेर शहरातील एका हॉटेलमध्ये मारहाण करण्यात आली होती. त्या ठिकाणी माझ्या खिशातील सर्व कागदपत्रे काढून घेण्यात आले असून या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख सुसाईड नोट मध्ये आहे.

आश्वी पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून यातील दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्याच्या कुटुंबाने घेतला आहे. मृत दीपक बलसाने यांचा भाऊ अविनाश बलसाने याने या प्रकरणातील दोषी आरोपींवर आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या या घटनेची माहिती मिळताच कनोली गावचे पोलीस पाटील नानासाहेब वर्षे यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती.

Web Title: young man commits suicide after being fed up with the demand of money from the finance company

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here