Home संगमनेर संगमनेर: तरुणाला मारहाण करून पुलावरून खाली फेकले

संगमनेर: तरुणाला मारहाण करून पुलावरून खाली फेकले

Breaking News | Sangamner: असलेल्या तरुणाला चार-पाच जणांनी मारहाण केली, त्याच्याकडील पाच हजार रुपये, गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली.

Young man beaten and thrown off bridge

संगमनेर : कापड दुकानात कामाला असलेल्या तरुणाला चार-पाच जणांनी मारहाण केली, त्याच्याकडील पाच हजार रुपये, गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. त्याला नदीवरील लहान पुलावरून खाली फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. १७) रात्री संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगी नदी परिसरात घडली.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या तरुणावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून शनिवारी दुपारी पोलिस अधिकारी, कर्मचारी त्याचा जबाब नोंदवून घेत होते. शुभम सुरेश भोईर (वय २८, रा. घोडेकर मळा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. शुभम भोईर हा शहरातील एका कापड दुकानात कामाला आहे. दिवाळी असल्याने दुकानात ग्राहकांची गर्दी असते. त्यामुळे ओव्हर टाइम करून रात्री ११:४५ वाजेच्या सुमारास तो त्याच्या दुचाकीवरून घरी जात होता. म्हाळुंगी नदीवरील लहान पुलावर आला असता चार-पाच जणांमध्ये भांडण सुरू होते, त्यावेळी त्यांनी भोईर याला थांबविले. त्याची गाडी बंद करून तो कुठे राहतो, अशी विचारणा करत त्याला मारहाण केली. तो सुटून पळून जात असताना पुन्हा त्यांनी त्याला पकडले आणि नदीच्या पुलावरून खाली फेकून दिले. जीव वाचविण्यासाठी त्याने एका घरात आश्रय घेतला, मोबाइलवरून कुटुंबीयांना फोन करत घडला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीय तेथे पोहोचले, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Breaking News: Young man beaten and thrown off bridge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here