Home अकोले तळेगावच्या पिण्याच्या पाण्याच्या नवीन योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू

तळेगावच्या पिण्याच्या पाण्याच्या नवीन योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू

Sangamner News: येत्या पंधरवाड्यात योजनेचे काम पूर्ण होणार असून या योजनेमुळे गावाचा पाणीप्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागण्यास मदत होणार.

Work on the new drinking water scheme of Talegaon 

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावाला आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी भागवतवाडी शिवारातील गायत्री कंपनीच्या तलावामधून पाईपलाईनने पाणी आणण्याच्या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी पाहणी केली. येत्या पंधरवाड्यात योजनेचे काम पूर्ण होणार असून या योजनेमुळे गावाचा पाणीप्रश्न कायम स्वरूपी मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

तळेगाव दिघे ग्रामपंचायत अंतर्गतच्या भागवतवाडी शिवारातील गायत्री प्रोजेक्ट कंपनीचा ५ एकरातील१२०फुटखोलीचा तलाव योजनेसाठी वापरला जाणार आहे. त्या तलावात निळवंडे डाव्या कालव्याच्या पाझराचे पाणी साठविण्यात आले आहे.

सद्यस्थितीला गायत्री साठवण तलावात अंदाजे ५० हजार कोटी लिटर पाणीसाठा आहे. स्थानिक योजनेद्वारे हे पाणी ग्राम स्थांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लाग णार आहे.

 या तलावातील पाणी तळेगावच्या नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी गावचे सरपंच मयूर दिघे यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती त्यानंतर स्वतः आ खताळणी अधिकाऱ्यांसह या तळ्यावर जाऊन पाहणी करत हे पाणी तळेगावला देण्याच्या निर्णय घेतला त्यानंतर या पाईप लाईनचे काम सुरू झाले आहे

 संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी स्वतः तळेगाव दिघे येथे जाऊन पाणी योजने च्या पाईपलाईनची पाहणी करीत माहिती घेतली. यावेळी त्यांच्या समवेत तळेगावचे प्रभारी सरपंच मयूर दिघे, दत्तात्रय दिघे, रामदास दिघे, उत्तम दिघे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब दिघे, अतुल कदम, राजेश दिघे, गोरख इल्हे, गणेश दिघे प्रभारी ग्रामविकास अधिकारी अजिनाथ कडलग, गणेश बोखारे उपस्थित होते.

राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे , माजी खासदार डॉ. सुजय विखे  व यांच्या नेतृत्वाखाली आणि आ अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दिघे ग्रामपंचायतने पंधरावा वित्त आयोग, जिल्हा परिषद टंचाई निवारणनिधी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलजीवनच्या सहयोगातून जलवाहिनीचे काम, गावाच्या नजीक ६८ गुंठे क्षेत्रात साठवण तलाव निर्मिती कामे करण्यात आली आहेत. योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. तळेगावचा पाणीप्रश्न पंधरवाड्यात कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे तळेगावचे प्रभारी सरपंच मयूर दिघे यांनी सांगितले.

Web Title: Work on the new drinking water scheme of Talegaon 

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here