अपघातात महिलेच्या गर्भातील बाळाचा मृत्यू, पिकअपची दुचाकीला धडक
Breaking News | Sinner Accident: शिवारात पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या गर्भवती महिलेच्या पोटातील ७ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना.
सिन्नर: नाशिक पुणे महामार्गावर नांदुरशिंगोटे शिवारात पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या गर्भवती महिलेच्या पोटातील ७ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. तसेच दुचाकीस्वारासह त्याची पत्नी व मुलगाही गंभीर जखमी झाले.
सिन्नर शहरातील मापारवाडी परिसरात राहणारे अक्षय ज्ञानदेव मोकळ (२६) हे आपली ७ महिन्यांची गर्भवती पत्नी श्रेया व मुलगा हर्षद यांना दुचाकीवर घेऊन संगमनेरकडे जात होते. नांदूरशिंगोटे शिवारात पाठीमागून आलेली पिकअप क्र. एम. एच. १५/ जी. व्ही. ८३४० ने मोकळ यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर पिकअपचालकाने वाहनासह तेथून पळ काढला. पिकअपने धडक दिल्याने मोकळ यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा रस्त्यावर फेकले गेले. यात मोकळ यांचा पाय मोडला गेला. तर पत्नी श्रेया व मुलगा हर्षद हेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी मदत करत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. श्रेया या ७ महिन्यांच्या गर्भवती असल्याने व अपघातात पोटाला मार लागल्याने डॉक्टरांनी सिझर करुन त्यांची प्रसृती केली. मात्र, पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मोकळ यांनी उपचार घेत वावी पोलीस ठाण्यात पिकअपचालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक देविदास लाड करत आहेत. अपघातात महिलेच्या पोटातील गर्भाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Web Title: Woman’s unborn child dies in an accident
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study