संगमनेर: बसमधून महिलेचे १ लाख २० हजार रुपयांचे दागिने लंपास
Sangamner news: महिलेचे अंदाजे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने चोरी (Theft) केल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर शहरातील एका महिलेचे चार तोळ्याचे सोन्याचे गंठण अज्ञात चोराने लंपास केल्याची घटना बस प्रवासादरम्यान घडली. शहरातील बस स्थानकातून संगमनेर ते पिंपळगाव देपा दरम्यान प्रवास करताना पंचेचाळीस वर्षीय महिलेचे अंदाजे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना मंगळवार दि. २८ मार्च रोजी तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली आहे.
मंगळवारी तीन वाजेच्या दरम्यान घरकाम करणारी पंचेचाळीस वर्षीय महीला कविता सुरेश साळुंखे या आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी पिंपळगाव देपा येथे जाण्यासाठी संगमनेर स्थानकात आल्या असता बस स्थानकात खूपच गर्दी होती. तर त्यांनी संगमनेर ते साकुरला जाणारी बस पकडली.
बस मध्ये देखील मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत तसेच संगमनेर ते पिंपळगाव देपा प्रवासा दरम्यान अज्ञात चोरट्याने पर्सची चैन खोलून त्यात ठेवलेले अंदाजे एक लाख वीस हजार रुपये किमतीचे चार तोळ्यांचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने चोरी केले आहे.
याप्रकरणी घारगाव पोलिस स्टेशनला संगमनेरातील मालदाड रोड येथील सार्थक कॉलनीतील रहिवासी कविता सुरेश साळुंखे यांचे फिर्यादी नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Woman’s jewelery worth Rs 1 lakh 20 thousand theft from bus
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App