अहमदनगर ब्रेकिंग: कामावर यायला उशिर झाला, मालकिणीने जाब विचारताच केला खून
Ahmednagar News: कामावर उशिरा का आलास असे विचारल्याने संतप्त झालेल्या कामगाराने चाकूने सपासप वार करून मालकिणीचा खून (Murder) केल्याची घटना.
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. कामावर उशिरा का आलास असे विचारल्याने संतप्त झालेल्या कामगाराने चाकूने सपासप वार करून मालकिणीचा खून केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी खंडू काशिनाथ चंदन यांच्या फिर्यादीवरून मयूर संजय भागवत यांच्या विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे विवेक आर्टस् हा गणपती मूर्ती बनवण्यच्या कारखान्यात कामास असणाऱ्या मयूर भागवत या मूर्ती कारागिराने शुल्लक कारणावरून कारखान्याच्या मालक असणाऱ्या ताराबाई काशिनाथ चंदन या 72 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर चाकूने साप सप वार करून गंभीर जखमी केले होते.
मात्र गंभीर जखमी अवस्थेत ताराबाई यांना अहमदनगर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणले असताना उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला मयूर भागवत याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र ताराबाई यांचा मृत्यू झाल्यानंतर खून करणे 302 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूर हा 30 मार्च रोजी सुट्टी घेऊन अहमदनगर येथे आपल्या घरी गेला होता मात्र त्याला कामावर येण्यास उशीर झाल्याने ताराबाई चंदन याने त्याला याबाबत तु कामावर काल येणार होता उशीर का केलास असे विचारले होते. यावर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. मात्र यावेळी ताराबाई यांच्या मुलाने हे भांडण सोडवले होते. त्यानंतर रात्री ताराबाई या झोपलेल्या असताना आरोपी मयूर भागवत याने ताराबाई यांच्या चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. मात्र, त्यांचा खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. याप्रकरणी मयूर भागवत याला पोलिसांनी अटक केली आहे.
Web Title: he came to work, the mistress Murder him as soon as he asked for the job
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App