मॉलमध्ये खळबळ, बेसमेंटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
Breaking News | Mumbai Crime: शॉपिंग मॉलच्या बेसमेंटमध्ये एका महिलेचा मृतदेह (Woman Dead body) आढळून आल्याने खळबळ.
मुंबई : शॉपिंग मॉलच्या बेसमेंटमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. भांडूपममधील ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये या महिलेचा मृतदेह आढळला, या महिलेचं वय साधारण 30-35 वर्ष असल्याचं सांगण्यात येत आहे. महिलेला मुलुंडमधील जनरल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे.
महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे मॉल आणि आसपास परिसरात भीतीचं वातावरण आहे. मॉलच्या बेसमेंटमध्ये एका कर्मचाऱ्याला सकाळी हा मृतदेह आढळून आला, त्यानंतर त्याने याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
मॉलच्या अधिकाऱ्यांनी यानंतर तात्काळ पोलिसांना बोलावलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा मृतदेह मॉलच्या बेसमेंटमध्ये जमा झालेल्या पाण्यात तरगंत होता. यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवला. ही महिला कोण आहे? याची आणि तिच्या कुटुंबाची माहिती घेत आहे. यासाठी स्थानिक लोकांचीही मदत घेतली जात आहे. तसंच मॉलचा सीसीटीव्हीही पोलिसांकडून तपासला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
Web Title: woman’s body was found in the basement
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News