संगमनेर बसस्थानकातून महिलेचे गंठण लांबवले
Breaking News | Sangamner: बसस्थानकात असलेल्या महिलेचे दीड तोळे वजनाचे गंठण अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना.
संगमनेर: येथील बसस्थानकात असलेल्या महिलेचे दीड तोळे वजनाचे गंठण अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की सुरेखा नारायण कस्तुरे (वय ६५, रा. कस्तुरी अपार्टमेंट, घारपुरी घाट, आधार आश्रमासमोर, अशोक स्तंभ नाशिक) या संगमनेर बसस्थानकात होत्या. त्यावेळी
अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा उठवून त्यांचे दीड तोळे वजनाचे ४८ हजार रुपयांचे गंठण चोरुन पोबारा केला. याप्रकरणी सुरेखा कस्तुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांत अज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला
आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात दागिने चोरीचा सिलसिला सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासाठी पोलिसांनी वेळीच उपाययोजना आखून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
Web Title: woman was dragged from Sangamner bus stand
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study