Home औरंगाबाद 22 व्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या

22 व्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या

Thane Suicide Case: एका 45 वर्षीय महिलेने 22 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना.

woman suicide from 22nd floor ends life in thane

ठाणे : ठाण्यात हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास एका 45 वर्षीय महिलेने 22 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  दिशा धुळधुळे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. मात्र, इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, यामध्ये महिला तंबाखू चघळत असल्याचे आढळून आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या महिलेचा पती आणि मुलगा आजाराने त्रस्त होते. या सगळ्याला कंटाळून महिलेने उडी घेतल्याचे बोलले जात आहे.

ही महिला ठाण्यातील वाघबीळ परिसरात राहणारी असून ती हिरानंदानी इस्टेटमधील पेनिकल इमारतीमध्ये एका रुग्णाला मसाज करण्यासाठी आली होती. त्यामुळे तिच्याकडे पेनिकल इमारतीत प्रवेश करण्यासाठीचे एक्सेस कार्ड होते. गुरुवारी सकाळी दहाच्या वाजेच्या दरम्यान ती एक्सेस कार्डचा वापर करुन हिरानंदानीच्या 22 व्या मजल्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर तिने तेथील पायऱ्यांवर बसून गुटखा खाल्ला आणि नंतर ती तेथील रेफ्युज फ्लॅटमध्ये गेली आणि तिकडून खाली उडी टाकल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचा पती किडनीच्या आजाराने तर तिच्या मुलगा डोळ्यांच्या विकारने त्रस्त होते. तसेच या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही व्यवस्थित नव्हती. या सर्व गोष्टींमुळे ती महिला प्रचंड नैराश्यात होती. याच नैराश्यामध्ये तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला असून त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवण्यात आला. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: woman suicide from 22nd floor ends life in thane

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here