Rape | हॉटेलवर महिलेस गुंगीचे औषध देऊन अत्याचार, अश्लील फोटो काढून व्हायरल
Pathardi Rape Case: लॉजवर नेऊन पिडीतेवर बलात्कार, अश्लील फोटो काढून प्रसारित.
पाथर्डी: दीड महिन्यापूर्वी सोशियल मेडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. जेवण्याच्या बहाण्याने महिलेला हॉटेलवर बोलावून गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार (Rape) केला आणि यातील अश्लील फोटो (Porn Photo)सोशियल मेडीयावर प्रसारित करून महिलेची बदनामी केल्याचा प्रकार पाथर्डी येथून समोर आला आहे. पाथर्डी पोलिसांनी याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
सचिन सारुक (रा.येळी, ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशियीत आरोपीचे नाव आहे. . पीडित महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, संशयित सारुक व पीडितेची इन्स्टाग्रामवर तीन महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. फोनवरील संभाषण वाढून अधिक ओळख झाल्यानंतर 6 जुलै 2022 रोजी दोघांची पाथर्डीत बसस्थानकावर भेट झाली. तेथुन जेवणासाठी शेवगाव रस्त्यावरील एका हॉटेलमधे दोघे गेले. तेथे थंड पेयातून पिडीतेस गुंगीचे औषध देण्यात आले.
आरामाच्या कारणाने हॉटेलच्या लॉजच्या खोलीत पिडीतेस नेऊन संशयित सारूक याने तिच्यावर अत्याचार केले. यावेळी त्याने दोघांचेही नको त्या अवस्थेतील अश्लिले फोटो काढून ठेवले. यानंतर पुन्हा पिडीतेस त्याने बोलवण्याचा प्रयत्न केला. परंतु पिडीतने नकार देताच संशयिताने ते फोटो सोशल माध्यमांवर प्रसारीत करून तिची बदनामी केली. पाथर्डी पोलिसांनी संशयित सचिन सारुक यावर बलात्कार करणे, धमकी देणे व माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 67 (ए) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Woman rape at hotel by giving gungy drug