Home अहमदनगर नगरपंचायतीमध्ये महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, नगरसेवकावर गुन्हा

नगरपंचायतीमध्ये महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, नगरसेवकावर गुन्हा

Breaking News | Ahmednagar:  नगरपंचायतीतील महिला अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणून विनयभंग केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल.

Woman officer molested in city council, crime against corporator

कर्जत : नगरपंचायतीतील महिला अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणून विनयभंग केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक नामदेव राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या महिला अधिकाऱ्याने कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या ३१ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता कर्जत नगरपंचायतीत शासकीय काम करत असताना नामदेव चंद्रकांत राऊत तेथे आले. मी जे सांगितले तेच करायचे. कायदेशीर बेकायदेशीर काही संबंध नाही. मी सांगेल तीच पूर्व दिशा आहे, असे राऊत त्यांना म्हणाले.

यावर त्या म्हणाल्या की, मी बेकायदेशीर कुठलीही बिले काढणार नाही. याचा राग आल्याने राऊत यांनी शिवीगाळ, दमदाटी करत सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला. आपल्याला चापटीने मारहाण करून विनयभंग केला. आपण कोणाला फोन करू नये व रेकॉर्डिंग करू नये, म्हणून माझा फोन हिसकावून घेऊन फोडला. यावेळी तेथे ठिकाणी असणारे नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल यांनी मला सोडविले. त्यानंतर राऊत यांनी तू मला रस्त्यात दिस. मी तुला मारून टाकेल. माझ्यावर या अगोदरच अनेक केसेस आहेत. त्यामुळे एक वाढली तरी फरक काही पडणार नाही. पण तुझा गेमच करेल, अशी जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. आहे. त्यांच्या फिर्यादीवरून नामदेव राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Woman officer molested in city council, crime against corporator

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here