Home अकोले अकोले तालुक्यात जमिनीच्या वादातून महिलेचा विनयभंग

अकोले तालुक्यात जमिनीच्या वादातून महिलेचा विनयभंग

Woman molested in Akole taluka over a land dispute

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील केळी रुम्हणवाडी जमिनीच्या वादातून मारहाण व विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी ९ ऑक्टोबर रोजी घडली आहे.

अकोले तालुक्यातील केळी रुम्हणवाडी परिसरात राहणारी एक ४५ वर्षीय महिला व तिचे नातेवाईक, पती हे शेतजमीन नांगरणयासाठी गेले असता तेथे चौघा जणांनी येऊन ही शेतजमीन आमची आहे. तुमचा येथे काही संबंध नाही असे म्हणत पती व महिलेला मारहाण केली. त्याचबरोबर शेतकरी महिलेला खाली पाडून धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला.

याप्रकरणी पिडीत महिलेने अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून मधुकर निवृत्ती बिन्नर, संदीप मधुकर बिन्नर अनिल मधुकर बिन्नर, मारुती निवृत्ती बिन्नर रा. सर्व केळी रुम्हणवाडी यांच्या विरोधात अकोले पोलिसांत भादवि कलम ३५४, ३२३, ५०४,५०६,३४ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल भोसले करीत आहे.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Woman molested in Akole taluka over a land dispute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here