Crime: अकोलेत अवैध दारूविक्रेत्याकडून महिलेचा विनयभंग
Akole Crime: दारू विक्रेत्यावर एका विवाहित महिलेचा विनयभंग (molested) तसेच तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
अकोले: अकोले तालुक्यात अवैध देशी दारूचा पुरवठा करणाऱ्या सचिन जाधव या दारू विक्रेत्यावर एका विवाहित महिलेचा विनयभंग तसेच तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
सचिन जाधव या दारू विक्रेत्याचे इंदोरी फाटा येथे हॉटेल सह्याद्री या नावाने एक हॉटेल सुरू आहे. या हॉटेलातून सचिन जाधव हा अकोले तालुक्यात दारूचा पुरवठा करीत असतो. सोमवार दि. १० सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पीडित महिला, तिचा पती व मुलगी हे अकोले येथे दवाखान्यात चालले होते.
यावेळी पिडितेचा पती व सचिन जाधव यांच्यात हॉटेल सह्याद्री समोर पैशाच्या देवाण घेवाणीच्या वादातून दोघांमध्ये वाद झाले. यावेळी सचिन जाधव याने माझे पती यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या झटापटीत माझ्या गळ्यातील सहा ग्रॅमचे मिनी गंठण गहाळ झाले. तसेच माझ्या पतीला मारहाण करताना झालेल्या झटापटीत त्यांच्या खिशातील अंदाजे चाळीस हजार रुपये गहाळ झाले झाले आहे. त्यामुळे अकोले पोलिस ठाण्यात पिडितेच्या फिर्यादीवरून सचिन जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा आणि तिची मुलगी हे अकोले येथे तपास अकोले पोलिस ठाण्याचे हवालदार राजू कोरडे हे करीत आहे.
Web Title: Woman molested by illegal liquor seller in Akole Crime