Breaking News | Ahilyanagar Accident: दुचाकी व शैक्षणिक संकुलाची बस यांच्या अपघातात महिला ठार.
राहाता : दुचाकी व शैक्षणिक संकुलाची बस यांच्या अपघातात महिला ठार झाली. हा अपघात शिर्डी बायपास रस्त्यावर वाळकी फाट्यावर शुक्रवारी (दि.१९) सकाळी झाला. नानूबाई तात्याबा पवार (वय ६५ रा. वाळकी) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. वाळकी फाट्यावर तात्याबा तुकाराम पवार (वय ७०) हे पत्नी नानूबाई यांना घेऊन रेशन आणण्यासाठी जात होते. स्कूल बस समोरून धडकली. नानूबाई व पती तात्याबा हे रस्त्यावर पडले. उपचारादरम्यान नानूबाई यांचा मृत्यू झाला. महिलेचा मुलगा सखाराम पवार यांनी याबाबत फिर्यादी दिली.
कोर्हाळे बायपास क्रॉस करत असताना अचानक समोरून श्रीगणेश शाळेची पिवळ्या रंगाची स्कूल बस (क्रमांक 17 बी वाय 0218) अचानकपणे समोरून जोरात येऊन धडक दिली. त्यामुळे नानूबाई व पती तात्याबा हे रस्त्यावर खाली पडले. अपघात होताच दोघांनाही श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. याविषयी राहाता पोलीस ठाण्यात मयत महिलेचा मुलगा सखाराम तात्याबा पवार यांनी ही फिर्यादी दिली आहे. परंतु रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा शनिवारी मृत्यू (Death) झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण व बीट हवालदार नरोडे हे करत आहे.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली असून लहान मुलांच्या जीविताशी धोकादायक असणार्या बेदरकारपणे स्कूल बस चालवणार्या वाहन चालकावर कडक करण्यात यावी अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.
Web Title: Woman killed in bus accident