महिलेची दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
Kolhapur Crime: सासरच्या छळास कंटाळून विवाहित महिलेची दोन वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Suicide Case)
कोल्हापूर : मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी माहेरकडून दोन लाख रुपये आणण्यासाठी सासरमधील छळाला कंटाळून महिलेने दोन वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील भेंडवडे गावात ही घटना घडली.
काजल सलते आणि प्रियांशू सलते अशी मृतांची नाव आहेत. भुदरगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी पती, सासू, सासरा आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, मुंबईमध्ये फ्लॅट घेण्यासाठी माहेरकडून दोन लाख रुपये घेऊन ये असा तगावा काजल यांच्याकडे लावला होता. मात्र सासरच्या लोकांची ही मागणी पूर्ण होत नसल्याने काजल यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळूनच काजल यांनी घरापासून जवळच असलेल्या विहिरीत दोन वर्षाच्या प्रियांशुला घेऊन उडी घेतली. याप्रकरणी पती अवधूत सलते याच्यासह चौघांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: woman committed suicide by jumping into a well with her two-year-old child
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App