Home जालना पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून महिलेची आत्महत्या

पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून महिलेची आत्महत्या

पतीचे एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे सुरू झालेल्या कौटुंबीक वादातून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Woman commits suicide after being fed up with her husband's immoral relations

जालना : पतीचे एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे सुरू झालेल्या कौटुंबीक वादातून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. मनिषा संदीप रांधवन (२८, रा. पांगारकरनगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पतीविरोधात तालुका जालना ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विषयी तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांनी सांगितले, की मृत मूळ भोकरदन तालुक्यातील बोरगाव शिपोरा येथील रहिवासी असलेले संदीप बाबुराव रांधवन हा कुटुंबीयांसह जालना शहरात पांगारकरनगर येथे वास्तव्यास आहे. संदीप महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे पत्नी मनिषाला (२८) माहिती झाले होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये सातत्याने भांडण होत होते. गुरुवारी याच कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाला. त्यामुळे मनिषाने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, उपनिरीक्षक नागनाथ भताने, उपनिरीक्षक पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. दरम्यान, या प्रकरणी देविदास किसन जोशी (५०, रा. बोरगाव बु. ता. जाफ्राबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित संदीप रांधवन याच्याविरुद्ध पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Woman commits suicide after being fed up with her husband’s immoral relations

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here