Home अकोले अकोले: महिलेवर अत्याचार; आरोपीस पोलिस कोठडी

अकोले: महिलेवर अत्याचार; आरोपीस पोलिस कोठडी

Breaking News | Akole: दारू पिऊन एका ७५ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची घटना.

Woman abused Accused remanded in police custody

राजूर : दारू पिऊन एका ७५ वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याबाबत अकोले तालुक्यातील खडकी येथील सोमनाथ उर्फ नाथा सोमा बांडे (वय ४०) या आरोपीला राजूर पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी की, पीडित महिला खोपीत राहते. शनिवारी (दि. २४) रात्री अकराच्या सुमारास आरोपी या खोपीजवळ आला व पाणी पिण्यास मागितले. या महिलेने कोपीचा दरवाजा उघडत त्याला पाणी दिले. मात्र आरोपी तिच्या मागेच झोपडीत घुसला व अत्याचार केला. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सोमवारी त्या गावातील महिला आणि पुरुषांनी राजूर पोलिस ठाण्यात येऊन आरोपीला मोठी शिक्षा करावी अशी मागणी केली.

Breaking News: Woman abused Accused remanded in police custody

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here