अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा गळा आवळला, मुलाने पाहिलं म्हणून त्यालाही संपवलं
Mumbai Crime: पत्नीची गळा आवळून हत्या करत आत्महत्या असल्याचं भासवलं.
मुंबई: मुंबईतील कांदिवली येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे .पत्नीची गळा आवळून हत्या करत आत्महत्या असल्याचं भासवलं .चार वर्षाच्या मुलानं पाहिलं म्हणून त्याचीही हत्या करून आरोपीने पळ काढला होता .पत्नीसह अल्पवयीन मुलाची हत्या करणाऱ्या पतीला समता नगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे .शिवशंकर केंद्र दत्ता असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून दुहेरी हत्याच्या याच गुन्ह्यात त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याने अगोदर पत्नीची गळा आवळून हत्या करून तिने आत्महत्या केल्याचे चित्र निर्माण केले . ही हत्या करताना मुलाने पाहिले म्हणून चार वर्षे मुलाची देखील हत्या करून आरोपीने पळ काढला होता.कांदिवली येथे पत्नीसह चार वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या आरोपी पतीला अखेर समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीसह अल्पवयीन मुलाची हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या पतीचे नाव शिवशंकर केंद्र दत्ता असे आहे. दुहेरी हत्येच्या याच गुन्ह्यात त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे .या घटनेने मुंबई हादरली आहे.
Web Title: wife’s throat was choked due to the suspicion of an immoral relationship
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News