बायकोच्या दुसऱ्या नवऱ्याला गाठलं अन् वस्तऱ्याने गळा चिरून भररस्त्यात संपवलं
Breaking News | Pune Crime: एकाचा वस्तऱ्याने गळा चिरून खून (Murder) केल्याची घटना.
पुणे: बुधवार पेठेतील क्रांती चौकात एकाचा वस्तऱ्याने गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे. नईम शेख असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी पसार झालेला आरोपी कलाम उर्फ रूबेल शेख याला पुणे रेल्वे स्थानक परिसरात अटक केली. या घटनेने बुधवार पेठेत खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पश्चिम बंगालमधील एक महिला राहायला आहे. आराेपी कलाम शेख हा तिचा पती आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी तिने नईम शेख याच्याशी विवाह केला होता. ते दोघेजण एकत्र राहत होते. पत्नीने दुसरा विवाह केल्याची बातमी ऐकून कलाम शेख चिडला होता. त्या रागातून त्याने नईमचा काटा काढण्याचे ठरवले होते.
बुधवार पेठेतील क्रांती चौकात सागर बिल्डींगजवळ शुक्रवारी सायंकाळी कलाम शेख थांबला होता. त्यावेळी काही वेळाने नईम तेथे आला. त्यावेळी कलामने खिशातून वस्तरा काढला. नईमच्या गळ्यावर वस्तऱ्याने वार केला. गंभीर जखमी झालेल्या नईमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू (Death) झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
घटनेनंतर कलाम घटनास्थळावरून पसार झाला. तो साथीदारासोबत पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून त्याला साथीदारासह रात्री उशीरा अटक (Arrested) केली.
Web Title: wife’s second husband was attacked and murder
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study