पुन्हा एकदा गोळीबार, पैशाच्या वादातून झाडल्या गोळ्या, नंतर स्वत:लाही संपवलं
Breaking News | Pune Crime: माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना ताजी असताना पुण्यातही गोळीबाराची घटना समोर आली आहे. आरोपीने स्वतः गोळी झाडत आत्महत्या केली.
पुणे: बोरिवलीत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना ताजी असताना पुण्यातही गोळीबाराची घटना घडली आहे. पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पैशाच्या वादातून आरोपीने एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. एकाने दुसऱ्यावर गोळी झाडून नंतर आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औंधमध्ये ऑटोरिक्षामध्ये ही घटना घडली आहे.
पैशाच्या वादातून आरोपीने एका व्यक्तीवर गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबारानंतर आरोपीने स्वतः गोळी झाडत आत्महत्या केली. या प्रकाराने पुण्यातील औंध भागात खळबळ पसरली आहे. अनिल ढमाले असे गोळीबार करण्यात आलेल्या मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाल्याचे चित्र दिसत आहे.
Web Title: Shot again, shot over a money dispute, then killed himself
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study