पत्नीचे अनैतिक संबंध, अल्पवयीन मुलीच्या मदतीने पतीची हत्या
नागपूर | Nagpur Crime: अल्पवयीन मुलीच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाच दिवस कसून चौकशी केल्याने ही आत्महत्या नसून पत्नीने खून केल्याचे सिद्ध करत पत्नीला अटक करण्यात आली आहे. तर मदत करणाऱ्या अल्पवयीन मुलीला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
धर्मेंद्र गजभिये असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. निशा गजभिये असे खून करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. निशाचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध होते. यातूनच मुलीच्या मदतीने तिने पतीचा काटा काढला आहे.
पाच दिवसांपूर्वी मयत धर्मेंद्र गजभिये व त्यांची पत्नी निशा हिच्यासोबत कडाक्याचे भांडण झाले होते. त्यावेळी निशाने तिच्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने धर्मेंद्रचा गळा आवळून हत्या केली. मात्र नवऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार निशाने पारडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने त्यांनी कसून चौकशी केली असता निशाने हत्या केल्याच उघडकीस आले असून तिला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान निशाचा नवरा हा ट्रक चालक असल्याने तो सलग आठ ते दहा दिवस बाहेर राहत असे. दरम्यान निशाचे दुसऱ्यासोबत सुत जुळले. याची कुणकुण धर्मेंद्रला कुणकुण लागल्याने त्यांच्यात वाद होऊ लागले. यातूनच निशाने मुलीच्या मदतीने स्वतःच्या पतीची हत्या केल्याचे तिने सांगितले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: Wife’s immoral relationship, husband’s murder