Home सातारा बायको जास्त बोलते, नवऱ्याने रागात गळा दाबून केला खून

बायको जास्त बोलते, नवऱ्याने रागात गळा दाबून केला खून

Satara Crime: पत्नी जास्त बोलते म्हणून त्याचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना.

Wife talks too much, husband kills by strangulation in anger

सातारा :  पत्नी जास्त बोलते म्हणून त्याचा गळा दाबून खून केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडल्याची घटना घडली आहे.

कराड तालुक्यातील येथे बायको जास्त बोलत असल्याने नवऱ्याने गळा दाबून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. मयुरी कणसे असे 27 वर्षीय खून झालेल्या पत्नीचे नांव आहे. पत्नीचा खून करणाऱ्या पतीस कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास करीत आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, खून करणारा पती मयूर कणसे आणि मृत पत्नी मयुरी यांचे वारंवार खटके उडत होते. मयुरीचे सासरच्या लोकांशी पटत नसल्याने काही दिवस ती माहेरी देखील निघून गेली होती. परंतु अखेर नवऱ्याने तीची समजूत काढत काही महिन्यापूर्वीच तीला पुन्हा सासरी आणले. त्यानंतर दोघे घरच्यांपासून दूर भाड्याने घर घेऊन राहत होते. तिथे देखील त्या दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. दोघांमधील वाद इतके विकोपाला गेली के रागात मयुरने मयुरीचा गळा आवळला, यामध्ये तीचा मृत्यू झाला. मयुरी जास्त बोलते म्हणून खून केल्याचे मयुरने सांगितले. पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.

Web Title: Wife talks too much, husband kills by strangulation in anger

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here