Home क्राईम झोपेतच केली पत्नीची हत्या, हत्येनंतर पतीने घेतला गळफास

झोपेतच केली पत्नीची हत्या, हत्येनंतर पतीने घेतला गळफास

Nanded Crime: पत्नी झोपेत असताना पटीने तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर पतीने घरातच गळफास घेत आत्महत्या.

Wife Murder in sleep, husband hanged himself after murder

नांदेड: पत्नी झोपेत असताना पतीने तिची हत्या करून नंतर पतीने घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका या हत्येच्या घटनेने हादरला आहे. किनवट तालुक्यातील भिसी गावात ही घटना घडली आहे. पतीने आपल्या पत्नीची झोपेत हत्या केली आणि त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. रुपाली भालेराव (वय २९), मारुती भालेराव (वय ३५) अस पती पत्नीचे नाव आहे.

बुधवारी सकाळी रुपाली यांचा मृतदेह घरातील पलंगावर आढळून आला, तर मारुती यांचा मृतदेह देखील घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Web Title: Wife Murder in sleep, husband hanged himself after murder

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here