Home यवतमाळ धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं

धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं

Yavatmal Crime News: अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस.

wife killed her husband with the help of her lover

यवतमाळ: यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रभाकर मारवाडी असे  हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. तर जयश्री प्रभाकर मारवाडी असे पत्नीचे नाव आहे. तर सुरज रोहनकर असे प्रियकराचे नाव आहे. गेल्या काही काळापासून या दोघांचे प्रेम संबंध जुळले होते. दरम्यान त्यांच्या प्रेमसंबंधात मृतक प्रभाकर हा अडसड ठरत होता. दरम्यान प्रेमात अडसर ठरू पाहणाऱ्या पतीची हत्या करून हा अडसर दुर करावा, असा या दोघांचा बेत होता.

मिळालेली माहिती अशी की, जयश्री आणि सूरजने एक दिवस आखलेल्या योजनेनुसार प्रभाकरचे तोंड दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर हत्येचा पुरावा मिटवण्याच्या अनुषंगाने  गावाशेजारील एका फाट्यावर पती प्रभाकर यांचा मृतदेह फेकून दिला. मात्र कालांतराने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली असता संशयाची सुई पत्नी आणि तिच्या प्रियकराकडे वळली.

दरम्यान, पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी  केली असता दोघांनीच प्रभाकरची हत्या केल्याची कबुली दिली. सध्या पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून पूढील कायदेशीर कारवाई सध्या पोलीस करत आहेत. मात्र या हत्येच्या घटनेने सर्वत्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: wife killed her husband with the help of her lover

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here