गाडीत कोण आहे हे तेव्हाच का नाही बघितले? विखे पाटील
Breaking News | Nashik: आमदार रोहित पवार यांना नाशिक दौऱ्यात विखे पाटील यांनी दिले प्रत्युत्तर.
नाशिक : मंत्रालयात आलेल्या चारचाकी वाहनातून उतरलेले बांधकाम व्यावसायिक कोण होते, ते कोणाकडे गेले याची माहिती आरोप करण्यापूर्वी का घेतली नाही, असा टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला. आठवडाभरापूर्वी रोहित पवार यांनी यासंदर्भात केलेल्या आरोपाला विखे यांनी गुरुवारी (दि. १६) नाशिक दौऱ्यावर असतांना प्रथमच उत्तर दिले. कदाचित काचा खाली केल्या असत्या तर गाडीत रोहित पवार हेच दिसले असते, असा पलटवारही विखे पाटील यांनी केला.
काही दिवसांपूर्वी मंत्रालयात मोठे चारचाकी वाहन आले होते. त्याची कोणीही तपासणी केली नाही. ती थेट मंत्रालयाच्या पोर्चमध्ये गेली. या कारमधून मोठा बांधकाम व्यावसायिक कोणत्या मजल्यावर गेला आणि त्याचे काय काम होते? असे वक्तव्य पवार यांनी केले होते. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिक मंत्रालयात तत्कालीन महसूल मंत्री यांना भेटल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर विचारले असता आजपर्यंत असे कधीही झाले नाही. त्यामुळे माहिती घेऊन आमदार पवार बोलले असते, तर बरे झाले असते. मंत्रालयात अनेक गाड्या येतात. त्यामुळे अमुक गाडी माझ्याकडेच आली, हे कसे? सांगता येईल. या संदर्भात आधी चौकशी करायला हवी होती. त्या गाडीला काळ्या काचा होत्या, असे आमदार पवार म्हणत होते. काचा खाली करून बघायला पाहिजे होत्या, कदाचित काचा खाली केल्या असत्या तर गाडीत तेच दिसले असते, असा टोमणा विखे पाटील यांनी मारला.
Web Title: Why didn’t you see who was in the car then Vikhe Patil
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News