फोनवर एवढा वेळ का बोलत होतीस या कारणावरून पत्नीवर ब्लेडने वार
धुळे: फोनवर एवढा वेळ का बोलत होतीस? या कारणावरून झालेल्या वादात पतीने आपल्या पत्नीवर ब्लेडने सपासप वार करत जखमी केल्याची घटना घडली आहे. सोमवारी धुळे तालुक्यातील आर्वी गावात ही घटना घडली. यांनतर पतीने विष प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
धुळे तालुक्यातील आर्वी येथे वसंत सक्राम सोनवणे हे आपल्या परिवारासोबत रहातात. सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्याची पत्नी काजल ही कुणाशी तरी फोनवर बराच वेळ बोलत होती. बराच वेळ होऊन देखील फोन सुरु असल्याने याचा राग वसंत सोनवणे यांना आला. फोनवर एवढा वेळ का बोलत होतीस हा जाब विचारण्यात आला.वादाचे रुपांतर जबर भांडणात होऊन त्याने तिच्यावर ब्लेडने सपासप वार केले. यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर वसंत याने विषारी औषध घेऊन आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला.
Web Title: Why are you talking on the phone for so long