जरांगे कोण आहेत? मी त्यांना ओळखत नाही…!
Maratha Reservation: जरांगे कोण आहेत? त्यांना मी ओळखत नाही… मराठा आरक्षणावर त्यांचा काय अभ्यास आहे? अशा चेष्टायुक्त शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यावर टीका.
पुणे : जरांगे कोण आहेत? त्यांना मी ओळखत नाही… मराठा आरक्षणावर त्यांचा काय अभ्यास आहे? अशा चेष्टायुक्त शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.
पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले की, भारतीय घटनेच्या कलम १५ उप कलम ४ नुसार ५२ टक्क्यांच्या वर आरक्षण द्यावे आणि ते मागास आयोगाकडे पाठवावे, त्याचे सर्वेक्षण
करावे, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मताचा मी आहे. मराठा समाज कधीही ओबीसींमधून आरक्षण घेणार नाही.
प्रकाश आंबेडकरांना अटक करा
प्रकाश आंबेडकर यांनी दंगलींबाबत जे वक्त्तव्य केले आहे त्यावर बोलताना राणे यांनी अॅड. आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी केली.
Web Title: Who is Jarange? I don’t know them Maratha Reservation
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App