संगमनेर शहरात वाहनावरील नियंत्रण सुटले विचित्र अपघात अन….
Sangamner Accident: भरधाव वेगाने वाहन चालवत असताना अचानक शिंक आल्याने वाहन चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या विचित्र अपघातात दोन वाहनांचे नुकसान झाल्याची घटना.
संगमनेर: भरधाव वेगाने वाहन चालवत असताना अचानक शिंक आल्याने वाहन चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या विचित्र अपघातात दोन वाहनांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात घडली. या अपघातामुळे वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले येथील एक जण आपल्या वाहनांमधून (क्रमांक एम. एच. 14 सी. के. 5561) शिर्डीहून संगमनेरकडे येत होता. त्याचे वाहन संगमनेर येथे आले असता नाशिक -पुणे महामार्गावरील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात अचानक त्याला जोराची शिंक आली. यामुळे त्याचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याचे वाहन समोरून जाणार्या वाहनावर (क्रमांक एम. एच. 17 सी. जे. 0020) धडकले. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
अपघात ग्रस्त दुसर्या वाहनाने आणखी एका वाहनाला धडक दिली. या अपघाताची माहिती मिळताच अनेक जण अपघात स्थळी जमा झाले. वाहनांचे नुकसान झाल्यामुळे वाहन चालकांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. यामुळे वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
Web Title: Weird accident in Sangamner city where the vehicle lost control
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App