उष्माघाताने दोघांचा मृत्यू, तापमानाचा पारा ४३ अंशाच्या पुढे, हवामान खात्याकडून इशारा
Weather Alert: राज्यात तापमानाचा पारा ४३ अंशाच्या पुढे गेला असून हवामान खात्याकडून आणखी उष्णतेच्या लाटेचा इशारा.
नाशिक / नांदेड: राज्यात तापमानाचा पारा ४३ अंशाच्या पुढे गेला असून हवामान खात्याकडून आणखी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात येत आहे. दरम्यान राज्यात शनिवारी उष्माघाताने एका महिलेसह दोघांचा मृत्यु झाला आहे.
साकोरा (ता. नांदगाव जि. नाशिक) येथे शुक्रवारी दुपारी किराणा दुकानदार प्रल्हाद हिरे यांच्या मातोश्री भीमाबाई शिवराम हिरे (७०) यांना चक्कर येऊन उलटी झाल्याने बेशुद्ध पडल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. हिमायतनगर (जि. नांदेड) येथील विशाल रामराम मादसवार या युवकाचा शनिवारी मृत्यु झाला.
शुक्रवारी विशाल मादसवार हा शेतात गेला होता. सायंकाळी त्यांना उलटी झाल्याने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी विशालला मृत घोषित केले. विशाल मादसवार यांची जीभ कोरडी पडली होती. त्यांना उष्माघात होऊन नॉर्मल अटॅक येऊन मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.
Web Title: Weather Alert Two died due to heat stroke, the temperature exceeded 43 degrees
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App