विराट कोहलीचा कसोटी कर्णधारपदालाही रामराम, ट्वीटमध्ये म्हटलेय
Virat Kohli: टी-२० नंतर वन डे सामन्यांचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा घोषित केला आहे. शनिवारी विराट कोहलीने सोशल मीडियावरुन कसोटी कर्णधारपद सोडल्याची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यामधील वाद सुरु होता. टी20 कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली आणि बीसीसीआय असा वाद सुरु झाला होता. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 58.82 टक्के सामने जिंकले आहेत. विराटच्या नेतृत्वावात 68 पैकी 40 सामने जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने केलाय. विराट भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार आहे.
नुकत्यात दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला 2-1 ने पराभवाला सामोरं जावं लागले. त्यानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
विराट कोहलीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय:
विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडत असल्याची माहिती ट्वीट करत दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये एक पत्र पोस्ट केले आहे. यामध्ये विराट कोहलीने बीसीसीआय आणि चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. त्यासोबत आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख केला आहे. विराट कोहली म्हणतो, ‘ मागील सात वर्षांपासून भारतीय संघाला योग्य दिक्षेला घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझी जबाबदारी इमानदारीने पूर्ण केली आहे.” मला इतक्या मोठ्य कालावधीपर्यंत संधी दिली, त्याबद्दल बीसीसीआयचे आभार व्यक्त करतो, असेही कोहलीने म्हटलेय.
Web Title: Virat Kohli resigns as Test captain