लोणी: विखेंची नातवंडे बचावली बिबट्याच्या हल्ल्यातून
राहता: आमदार राधाकृष्ण विखे व जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांची दोन नातवंडे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली आहे. शनिवारी ही घटना घडली. शेताच्या कडेला शालिनीताई विखे नातवंडे यांना खाऊ देत असताना बिबट्याने झेप घेतली मात्र तेथे कुत्रे मध्ये आले आणि या कुत्र्याला पकडून बिबट्याने उसात धूम ठोकली.
लोणी येथील शेतात शनिवारी शालिनी विखे या आपल्या नातवंडांना खाऊ देत बसल्या होत्या. डॉ. सुजय विखे यांचे यांची सहा वर्षाची मुलगी अनिशा आणि विखेंची कन्या सुस्मिता यांचा मुलगा जयवर्धन यांना खाऊ देत बसल्या होत्या.
त्यावेळी त्यांचा कुत्रा तेथे आला होता. उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट मुलांच्या दिशेने झेप घेतली मात्र त्यावेळी फिरणारे कुत्रे बिबट्याच्या जबड्यात सापडले. काही क्षणातच बिबट्या कुत्र्याला घेऊन उसात धूम ठोकली. देवाच्या कृपेने विघ्न टळले, लोकांची सेवा विखे घराणे करीत आहेत त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत या आशीर्वादानेच आम्ही बचावलो असे मत शालिनीताई विखे यांनी व्यक्त केले.
Web Title: Vikhen’s grandchildren rescued from a leopard attack