Home क्राईम धक्कादायक! वैकुंठ स्मशानभूमीत रात्री अघोरी कृत्य, चितेजवळ जादूटोणा करताना 2 तृतीयपंथीयांना अटक

धक्कादायक! वैकुंठ स्मशानभूमीत रात्री अघोरी कृत्य, चितेजवळ जादूटोणा करताना 2 तृतीयपंथीयांना अटक

Pune Crime: चितेजवळ जादूटोण्याचं (witchcraft ) अघोरी कृत्य, दोन तृतीयपंथांना अटक.

Vaikunth crematorium, 2 third parties arrested for witchcraft near the pyre

पुणे: पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोन तृतीयपंथीयांकडून चितेजवळ जादूटोण्याचं अघोरी कृत्य केल्याचं समोर आले आहे. वैकुंठ स्मशानभूमीत रात्री 1 वाजण्याच्या सुमारास एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर काही तासाने लक्ष्मी शिंदे आणि मनोज धुमाळे हे तृतीयपंथी चितेजवळ आले आणि त्यानंतर त्यांनी आणलेले काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सूया आणि हळदी कुंकू हे साहित्य घेऊन काही तरी कृती करीत होते.

हा सर्व प्रकार स्मशानभूमीमधील एक कर्मचाऱ्याने पहिला आणि पोलिसांकडे तक्रार केली. विश्रामबाग पोलीस तातडीने घटनास्थळी आले आणि दोघांना रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात नरबळी आणि अमानुष अघोरी, दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013 कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याआधीदेखील या स्मशानभूमीत जादूटोण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अमावसेच्या दिवशी चितेवर लिंबू, टाचण्या आणइ कोंबड्या टाकल्याचं समोर आलं होतं. सांगली, कोल्हापूरमध्ये अघोरी जादू टोण्याच्या  घटना समोर आलेल्या आहेत.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: Vaikunth crematorium, 2 third parties arrested for witchcraft near the pyre

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here